Best Course For SPI Aurangabad Exam 2021 Disha Foundation.
सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या प्रवेश परीक्षेच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांना हमखास यश मिळावे यासाठी आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमने संपूर्ण सिल्याबस ला जवळपास साडेचारशे घटकांमध्ये विभागलेली आहे. गेल्या पाच वर्षांचा परीक्षेचा अभ्यास करून हे घटक निश्चित करण्यात आले आहेत. या घटकांवर प्रश्न विचारले जाण्याची वारंवारता( फ्रिक्वेन्सी) अधिक असते.
तसेच येणाऱ्या परीक्षेचे Most Probable Questions सुद्धा आमची टीम तयार करत असते. यामध्ये विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा कालावधी आणि ऊर्जा दोघांची बचत होते. निश्चित कालावधी मध्ये परीक्षेची तयारी करण्यासाठी हा पॅटर्न गेल्या या तीन वर्षात यशस्वी सिद्ध झाला आहे.
Crack 300 Program For Written Exam:सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या प्रवेश परीक्षेतला पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा आहे. यामध्ये पहिल्या 300 सर्वाधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना इंटरव्यू साठी बोलावले जाते. त्यामुळे दिशा फाउंडेशन या प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा पास करायला प्राधान्य देते. सोबत त्यांची इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा सुरू असते. लेखी परीक्षा नंतर पूर्ण लक्ष इंटरव्यू वर केंद्रित केले जाते.
हा प्रोग्राम ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरुपात असतो. सुरुवातीचे काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षण शनिवार आणि रविवार तसेच इतर सुट्टीच्या दिवशी दिवशी दिले जाते. आणि शेवटी एक महिन्यासाठी औरंगाबाद येथे आमच्या प्रशिक्षण केंद्रावर विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची लेखी परीक्षेची तसेच ईन्टरव्यू ची तयारी करून घेतली जाते. सध्या covid नियमांमुळे आम्ही ऑफलाइन प्रशिक्षण तात्पुरते बंद ठेवले आहे. शासनाच्या गाईडलाईन्स नुसार लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. सध्या विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेऊन परीक्षेची तयारी सुरु करु शकतो.
दिशा फाउंडेशन: सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षा- मुलाखतीची तयारी मुलाखतीच्या तयारीसाठी पहिल्या आठवड्यापासूनच विद्यार्थ्यांना खालील घटकांसाठी मार्गदर्शन केले जाते.तसेच लेखी परीक्षेच्या नंतर मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सात दिवसांसाठी आमच्या औरंगाबाद प्रशिक्षण केंद्रावर बोलावून इंटरव्यू साठी सविस्तर मार्गदर्शन केले जाते.
आमचे इंटरव्यू तज्ञ विद्यार्थ्यांच्या बारीकसारीक गोष्टींवर ती लक्ष ठेवून त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि इंटरव्यू साठी एक उत्तम व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी प्रयत्न करतात.
Practice Makes Man Perfect असं म्हणतात. SPI प्रवेश परीक्षेला सुद्धा ही गोष्ट लागू पडते. ही परीक्षा विद्यार्थ्यांना आयुष्यात फक्त एकदाच देता येते. आणि संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद विद्यार्थ्यांच्या एका निर्णयात असते. त्यामुळे मिशन SPI टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना खूप फायद्याची ठरल्याची सिद्ध झाले आहे.
मिशन SPI टेस्ट सिरीज चे वैशिष्ट्य.